November 21, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा

मनोरुग्ण युवकाने एटीएम च्या दगड मारून काचा फोडल्या

खामगांव : येथे एका मनोरुग्ण युवकांने आयडीबीआय बँक व स्टेट बँकेचे एटीएम च्या दगड मारून काचा फोडल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास नॅशनल हायस्कूल जवळील आयडीबीआय बँक व खामगाव अर्बन बँक समोरील स्टेट बँक एटीएम वरील प्रवेशद्वारावरील गेटच्या काचावर एका मनोरुग्ण युवकांनी दगड मारले त्यामुळे दोन्ही एटीएमच्या काचा फुटल्या आहेत. अशा अचानक घडलेल्या घटनेमुळे एटीएम मध्ये उपस्थित असलेल्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते,

मात्र काही नागरिकांनी त्या मनोरुग्ण युवकाला पकडून चांगला चोप दिला व त्याला शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन ला असले असतात तो मनोरुग्ण असल्याने त्याच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली तो युवक मनोरुग्ण असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल न करता त्याला सोडून देण्यात आले. दोन्ही एटीएम चे काचा फुटल्यामुळे अंदाजे १० ते १५ हजाराचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिले आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 433 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 56 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

लौकिक घिवे याचा सायक्लोथान स्पर्धेत प्रथम क्रमांक

nirbhid swarajya

शेगावात धनगर समाज आक्रमक : शासनाचा नोंदविला निषेध

nirbhid swarajya
error: Content is protected !!