November 20, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय शेगांव

ना.परब साहेब हे चाललंय तरी काय ?

संपूर्ण राज्याला एक आदेश तर शेगाव आगाराला वेगळा आदेश का ?

रस्त्यावरून जाणाऱ्या बसेस मोजण्याची कामे दिली चालक-वाहकांना

शेगांव : राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. यामुळे प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून शासकीय कार्यालयांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करून अर्ध्यापेक्षा कमी कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थितीचे आदेश दिले आहे. याचे पालन हि सर्वत्र होतांना दिसत असतांना मात्र शेगावच्या एस टी.च्या आगार प्रामुख्याने एक वेगळा फतवा जारी करून १०० टक्के कर्मचाऱ्यांना ज्ञात्या नसलेल्या चालक-वाहकांनाही सकाळ पासून बसस्थानकात उपस्थित राहण्याचे आदेश देईल आहे. येव्हड्यावरच न थांबता कामे नसलेल्या चालक- वाहकांना शहरातील काही चौकांमध्ये उभे ठेवून येणाऱ्या जाणाऱ्या एस टी बसेस मोजण्याचे अजब काम दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे शासनाच्या कोवीड १९ संदर्भातील आदेशांना केराची टोपली दाखविल्याने एस टी महामंडळाचे मंत्री ना.परब साहेब हे आपल्या विभागात हे चाललंय तरी काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगार अंतर्गत येणारे एस टी बसस्थानक. याच ठिकाणावरून राज्यच्या कानाकोपऱ्यात बसेस जातात आणि येतात.

मात्र कोरोनाचा प्रभाव वाढल्याने फक्त २५ टक्के कर्मचाऱ्यांकडून काम घेऊन अत्यावश्यक फेऱ्यात चालविण्याचे एस टी महामंडळाचे आदेश आहे. हे खुद्द शेगाव आगाराचे आगार व्यवस्थापक सुभाष भिवटे हे मान्य ही करतात. तर ऐकले असेल हे महाशय स्वतः म्हणतात कि, या आगाराकडून २२० बस फेऱ्या चालविण्यात येत होत्या मात्र सध्या स्थिती फक्त ४५ फेऱ्या अत्यावश्यक प्रवाश्यासाठी चालविण्यात येत आहे. असे असतांना मात्र या महाशयांचे हे आदेशही बघा.. ४५ फेऱ्यासाठी लागणाऱ्या चालक-वाहकांना कर्तव्यावर बोलावण्या ऐवजी हे महाशय कामगिरी नसलेल्या कर्मचाऱ्यांनाही सकाळपासून बस स्थानकात उपस्थित राहणे आवश्यक केले आहे. येव्हड्यावरच न थांबता कामे नसलेल्या चालक-वाहकांना शहरातील काही चौकांमध्ये उभे ठेवून येणाऱ्या जाणाऱ्या एस टी बसेस मोजण्याचे अजब काम दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या सर्व प्रकारावरून शेगावच्या बस स्थानकात प्रवाश्यापेक्षा चालक-वाचकांची गर्दी जास्त होत आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांना ८ तास चौकात उभे राहण्याचे अनावश्यक काम दिल्याने या कर्मचाऱ्यांना कोरोनाच धोका आणखी वाढला आहे.यामुळे एस टी महामंडळाचे मंत्री ना.परब साहेब हे आपल्या विभागात हे चाललंय तरी काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related posts

खामगाव कृउबास निवडणुकीत महाविकास आघाडी की बिघाड़ी

nirbhid swarajya

भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मागणीचे निवेदन

nirbhid swarajya

बाप्परे… खामगावातील एका उद्योजकाकडून तब्बल पावणे दोनकोटींची कर चुकवेगिरी!

nirbhid swarajya
error: Content is protected !!