January 4, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई शिक्षण

ऑफर…. आणि बरेच काही…..!

खामगाव : देशासह संपुर्ण महाराष्ट्रात कोरोना वायरस ने हाहाकार माजवला आहे. एकीकडे कोरोना पेशेंटचा आकडा जिल्ह्यात वाढत आहे. तर सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी जनतेला विविध पायबंध घालून दिले आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळण्यासाठी लोक घरात जास्त वेळ मोबाइल वर घालवत आहेत. आणि सद्या सर्विकडे डिजिटल गोष्टी सुरु झाल्या आहेत.लोक आपला वेळ घालवण्यासाठी व्हाट्सएपचा वापर करत आहेत. मात्र याचाच फायदा लोकांची माहिती गोळा करण्यासाठी हॅकर्स नवनवीन युक्ती वापरत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारच्या ऑफर्सच्या नावाखाली सोशल मीडियाच्या माध्यमातून एक लिंक पाठवली जात आहे. या लिंकच्या माध्यमातून मोबाईलमधील प्रायव्हेट डाटा चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.काही दिवसांपासून फ्री मुव्हीज, आयपीएल ऑफर, काही नामवंत चॅनलचे दोन महिन्यांसाठी मोफत सबस्क्रिप्शन, ऑफरच्या नावाने अनेकांच्या मोबाईलवर लिंक पाठवली जात आहे. या लिंकला क्लिक करताच एक अप्लिकेशन डाऊनलोड होते. अप्लिकेशन डाउनलोड होताच आपल्या व्हॉट्सॲपच्या मदतीने आपण ज्या ग्रुपमध्ये असतो आणि आपल्याकडे ज्या व्यक्तींचे नंबर असतात, त्या सर्वांना या अप्लिकेशनची लिंक आपोआप जाते.

 ही साखळी अशीच सुरू राहते. या अप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या मोबाईलचा डेटा चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे स्मार्टफोन वापरकर्त्यांनी सावध रहावे असे माहिती तज्ज्ञांनी सांगितले आहे. जर कोणी हे अप्लीकेशन डाऊनलोड केले असेल तर त्यांनी मोबाईलच्या सेटिंगमध्ये जावून ॲप सेटिंगमध्ये जा. तेथे प्रोफाईल लिस्ट नावाने हे ॲप असेल. या ॲपच्या पुढे डॉट एक्सवायझेड, असे असू शकते. या ॲपला क्लिक केल्यानंतर फोर्स टू स्टॉप आणि क्लियर कॅच करावे. त्यानंतर मोबाईल बंद करून चालू करावा. तरच हे अप्लिकेशन मोबाईलमधून जाते. अन्यथा काही मिनिटांनी ॲपच्या मदतीने मेसेज पुढे फॉरवर्ड होतात. खामगांव मतदार संघाचे आ.आकाश फुंडकर यांच्या स्विय सहाय्यक रघुनाथ खेर्डे यांच्या सोबत सुद्धा असेच घडले होते. त्यांना सुद्धा एका ग्रुपवर एकाने ही लिंक टाकली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर ऑनलाईन स्टीम नावाचे अप्लिकेशन डाऊनलोड झाले. यानंतर ऑफरबाबतचा मेसेज आणि लिंक आपोआप त्यांच्या मोबाईलमधील सर्व ग्रुपवर आणि पर्सनल नंबरवर गेली. अप्लिकेशन डाऊनलोड होताच दोन-तीन मिनिटांसाठी त्यांचा मोबाईल हँग झाला होता. अप्लिकेशन डिलीट केल्यानंतरही मोबाईल हँग होणे किंवा दुसऱ्यांना मेसेज आपोआप जाण्याची अडचणी येत होती असे त्यांनी सांगितले. खामगाव शहरात सुद्धा अनेक लोकांच्या मोबाईल मध्ये असे अजूनही घडणे सुरू आहे, त्यामुळे मोबाईल युजर्सनी आता सावध राहणे गरजेचे झाले आहे. अश्या लिंक जर आपल्या मोबाइल वर आल्या तर त्या लिंकला ओपन करू नये असे आवाहन सुद्धा निर्भिड स्वराज्य कडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता मोबाइल यूजर्सला आपला डाटा वाचवायचा असेल तर सावध राहणे गरजेचे आहे.

Related posts

जिल्हयात आज प्राप्त ०६ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya

शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वाटप करण्यासाठी लोकप्रतिनिधींची बँकेत धाव

nirbhid swarajya

माझा वाढदिवस महावितरणची सर्व कार्यालये उपकेंद्र हयांना टाळा बंद व हल्ला बोल आंदोलन करुन साजरा करा- ॲड. आकाश फुंडकर

nirbhid swarajya
error: Content is protected !!