January 1, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

कोरोना परिस्थितीबाबत आ. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

कोरोना लस व रेमेडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा तात्काळ दुर करा- आ.ॲड.आकाश फुंडकर

खामगांव : कोरोना महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस महाभयंकर होत चालली आहे. अशातच कोरोना लस व रेमेडीसीवीर या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. एकीकडे पालकमंत्री रेमेडीसीवीर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे म्हणतात तर दुसरीकडे खामगांव येथील सामान्य़ रुग्णालयात ९५ टक्के इंजेक्शन्स़ हे बाहेरुन आणावे लागत आहेत. या परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. याबाबत संबंधीतांनी पाठपुरावा करुन उपाय योजना कराव्या असे निर्देश आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. कोरोना महामारीच्या परिस्थितीबाबत आज खामगांव तहसिल कार्यालयातील महात्मा गांधी सभागृह येथे खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपविभागीय अधिकारी जाधव, तहसिलदार रसाळ, मुख्याधिकारी आकोटकर, गटविकास अधिकारी राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी खिरोडकार, निवासी वैद्यकीय अधिक्षक निलेश टापरे, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हुड, खामगांव शहराच्या प्रथम नागरीक नगराध्यक्षा अनिता डवरे, आरोग्य़ सभापती ओम शर्मा, सभापती सिमाताई वानखडे, शिवानीताई कुळकर्णी, जाकीयाबानो अनीस जमादार, पंचायत समिती सभापती मोरे, उपसभापती तुषार गांवडे, रुग्ण कल्यास समिती सदस्य़ राम मिश्रा, आय एम ए चे अध्यक्ष डॉ हरीभाऊ वडोदे, संतोष वानखडे, शोहरत खान, रोटरी क्लब़ सदस्य विजय शर्मा, राहुल खंडेलवाल, अलोक सकळकळे यांची उपस्थिती होती. यावेळी खामगांव आरोग्य़ सभापती ओम शर्मा यांनी आपले विचार मांडले व नागरीकांना येत असलेल्या समस्या मांडल्या. यासोबतच निवासी वैद्यकीय अधिक्षक डॉ निलेश टापरे यांनी रॅमडीसीवर व कोरोना लसी बाबत माहीती दिली.

Related posts

खामगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचासह सदस्य निवडणूक

nirbhid swarajya

बलात्कार करून फरार आरोपी 37 वर्षानंतर पकडला

nirbhid swarajya

इलेक्ट्रिशन प्लंबर असोसिएशन खामगांव तर्फे वृक्षारोपण

nirbhid swarajya
error: Content is protected !!