January 8, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा

बँक खात्यात नजरचुकीने आलेले ८ लाख ३७ हजार रुपये केले परत

पत्रकार बबलू देशमुख यांचा प्रामाणिकपणा

खामगाव : बँक खात्यात नजरचुकीने ८ लाख ३७ हजार रुपये जमा झाले. मात्र कसलीही अपेक्षा न ठेवता ती सर्व रक्कम त्याच व्यक्तीला परत करून पत्रकार बबलू देशमुख यांनी प्रमाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय दाखवून दिला. शेगाव तालुक्यातील जलंब येथील पत्रकार अनिल उर्फ बबलू देशमुख यांच्या बँक ऑफ इंडिया शाखा खामगावच्या खात्यात ३१ मार्च रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास ८ लाख ३७ हजार ६२० रुपये जमा झाल्याचा एसएमएस आला. एवढी मोठी रक्कम जमा झाल्याचे पाहता बबलू देशमुख यांनी बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर इंगळे यांच्याशी संपर्क साधला व जमा झालेल्या रकमेची माहिती दिली. यावेळी मॅनेजर इंगळे यांनी बॅंक खाते तपासणी केली असता सदर रक्कम परभणी येथील घोडके यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परभणी येथून आरटीजीएस ने जमा झाल्याचे बबलू देशमुख यांना सांगितले. तर जोपर्यंत समोरची व्यक्ती तक्रार देत नाही तोपर्यंत आम्हाला या रकमेबाबत काहीही करू शकत नाही असेही सांगितले. तेव्हा बबलू देशमुख यांनी परभणी येथील सदरहु व्यक्तीशी संपर्क साधला व तुमचे ८ लाख ३७ हजार रुपये नजर चुकीने माझ्या खात्यात जमा झाल्याचे सांगितले.याप्रसंगी घोडके यांना सुखद धक्का बसला. ३ एप्रिल रोजी बबलू देशमुख यांनी बँक ऑफ इंडियाच्या खामगाव शाखेतून त्यांच्या खात्यात जमा झालेली सर्व रक्कम परत घोडके यांच्या बँक खात्यात आटीजीएस ने जमा केली.यामुळे घोडके यांनी देशमुख यांचे आभार मानले.दरम्यान बँक खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर बबलू देशमुख हे पैसे काढून खर्च करू शकले असते.तर घोडके यांनीही तुम्हाला किती रक्कम ठेवायची ते ठेवा व बाकीची रक्कम जमा केली तरी चालेल असे म्हटले होते. मात्र आजच्या काळातही पत्रकार बबलू देशमुख यांनी कसलीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले. हा प्रामाणिकपणा अनेकांना प्रेरणा देऊन जातो.

Related posts

कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाचे पुष्पवृष्टी करून केले स्वागत

nirbhid swarajya

खामगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारचा तीव्र निषेध

nirbhid swarajya

अक्षय्य तृतीयेनिमित्त कुंभार बांधवांना मातीच्या घागर विकण्याची परवानगी देण्यात यावी- आमदार आकाश फुंडकर

nirbhid swarajya
error: Content is protected !!