November 20, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

खामगाव : भारतीय जनता पार्टी हे राष्ट्र प्रथम या भावनेने देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम समर्थ भावनेने करत आहेत, भाजपचे राष्ट्रभक्ती चे विचार घराघरात पोहचवा आणि पक्षाचा आणखी मोठा विस्तार करा असे आवाहन भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे यांनी केले. भाजपचा स्थापना दिवस ६ एप्रिल रोजी स्थानिक भाजप कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सुरवातीला भाजप कार्यालयावर पक्षाचा ध्वजारोहण पार पडले, नंतर भाजप स्थापना व पक्ष वाढीत महत्वाची भूमिका पार पाडणारे स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाल उपाध्याय, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, प्रमोदजी महाजन, लोकनेते गोपीनाथजी मुंडे, भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संजय शिनगारे यांचेसह भाजपचे जेष्ठ नेते राजेंद्र बोचरे, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित आदी मान्यवरांनी भारतीय जनता पार्टी च्या स्थापना पासून ते आता पर्यंतचा इतिहास मांडला. यावेळी जि व सदस्य डॉ गोपाल गव्हाळे, प स सभापती सौ रेखाताई मोरे, उपसभापती तुषार गावंडे, तालुका सरचिटणीस शांताराम बोधे, न प आरोग्य सभापती ओम शर्मा, प स सदस्य विलासराव काळे, राजेश तेलंग, रामेश्वर बंड, माजी न प उपाध्यक्ष महेंद्र रोहनकार, नगरसेवक राजेंद्र धनोकार, जितेंद्र पुरोहित, जितेंद्रसिंग मेहरा, गोपाल ढोले, गोपाल महारखेडे, गणेश बोचरे,महिला आघाडीच्या सौ रेखाताई घोंगे, सौ योगिताताई गावंडे, राजेश पुरवार, श्री धंदर, दिलीप उमाळे, गोपाल शेलकर, विठ्ठल काटोले , बाबुराव राठोड, गजानन मुळीक, सुभाष इटणारे, युवराज मोरे, महादेवराव देशमुख, आदी कार्यकर्त्यांनीही प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. तसेच सर्वांनी संकल्प निधी स्वइच्छेने पक्षाच्या सुपूर्द केला. सर्वांनी लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकर यांचा शत प्रतिशद भाजपा हा नारा आणखी जनकल्यानासाठी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आगामी नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर निवडणूकिसाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन सर्व मान्यवरांनी केले. कोरोना नियमाचे पालन करून मोजक्या पदाधिकारिंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

Related posts

लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे पुण्यतिथी निमित्त तोडकर परिवाराचे वतीने अन्नदान…

nirbhid swarajya

धरणात बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

nirbhid swarajya

कृषि केंद्राची तपासणी

nirbhid swarajya
error: Content is protected !!