November 20, 2025
जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

रायगडावर सापडला हा शिवकालीन खजिना

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला आनंद

मुंबई : रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी! शिवाजी महाराजांचे आयुष्य आणि स्वराज्याचा कारभार इतिहास कालीन महाराष्ट्राने इथूनच अनुभवला. मयहाराष्ट्रातील प्रत्येकाचे श्रद्धास्थान याठिकाणी शिवशाही रुजली. याच पवित्र रायगडावर उत्खनना दरम्यान काही इतिहासकालीन वस्तू सापडल्या आहेत. रायगड प्राधिकरण मार्फत हे उत्खनन सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून पुरातत्व विभाग आणि प्राधिकरण हे उत्खनन करत असून या उतखननात आतापर्यंत अनेक महत्वाच्या वस्तू सापडल्या आहेत. नुकतंच इथं सोन्याची बांगडी आणि देवपूजेचं निरांजन सापडलं आहे. सोन्या चांदीच्या वस्तू सह इतरही शिवकालीन वस्तू इथे सापडल्याने, पुन्हा एकदा शिवकालीन इतिहासाची मोहर रायगडाला लागली आहे. २५० हून अधिक इमारतींचे चौथरे आजही रायगडावर जशास तशा अवस्थेत आहेत. उत्खननामध्ये ज्या वस्तू सापडल्या आहेत त्या वस्तू संग्रहालयात ठेवल्या जाणार असून त्या वस्तूंचे जतनही केले जाणार आहे.
किल्ले रायगडावर आतापर्यंत उत्खननामध्ये घराच्या छतावरच्या खपऱ्या, तोफगोळे सुरुंगाच्या गोळ्याचं कवच, घोड्याचे रिकीब, बांधकामासाठी वापरात येणारे वेगवेगळ्या आकारातील खिळे, मातीची भांडी, दगडी मूर्ती, शेतीची अवजारे अशा अनेक वस्तू सापडल्या आहेत. पुरातत्व विभागाकडे या वस्तू ठेवण्यात आलेल्या असून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवकालीन नाणे म्हणजेच होन इथे सापडण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Related posts

देवेंद्रदादा देशमुख मित्र मंडळाकडून गरजू विद्यार्थ्यांला आर्थिक मदत

nirbhid swarajya

आ.आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप

nirbhid swarajya

ऑनलाईन आयपीएल सट्टा खेळणाऱ्यांवर रेड ; १ अटक १ फरार

nirbhid swarajya
error: Content is protected !!