November 20, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

बुलडाण्यात 1 में पर्यंत १०० टक्के कोरोना लसीकरण करणाऱ्यांना देणार 1 लाखाचा बक्षीस

बुलडाणा : माजी मंत्री सुबोध सावजी यांनी कोरोना लसीचा प्रमाण वाढविण्याच्या हेतूने अनोखी शक्कल लढवली असून जिल्ह्यातील स्वराज संस्था असलेल्या ग्रामपंचायत,, नगरपंचायत तथा नगर परिषदा 1 मे पर्यंत आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरण करून घेईल अशा स्थानिक स्वराज्य संस्थेला एक लाखाचा बक्षीस माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या संपना सुबोध सावजी ट्रस्टकडून देण्यात येणार असल्याची घोषणा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे.यासंदर्भात सुबोध सावजी यांनी आज शुक्रवारी २ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांना एक अर्ज माहितीस्तव सादर करून या बक्षिसाची माहिती आपल्या परीने स्थानिक स्वराज संस्थेला देण्याची विनंती केली. बुलडाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनापासून सरक्षणसाठी लॉकडाऊन एकमेव पर्याय नसून खबरदारी घेणेही एक पर्याय आहे. शिवाय वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कोरोना लसीकरण झपाट्याने होणे गरजेचे आहे. आणि या प्रक्रियेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या अनुषंगाने माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी अनोखी शक्कल लढवत जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगर परिषदेंनी आपल्या क्षेत्रातील नागरिकांची शंभर टक्के कोरोना लसीकरण करून घेईल अशा स्थानिक स्वराज्य संस्थेला एक लाखाचे बक्षीस विकासनिधी म्हणून देऊन गौरवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Related posts

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुलडण्यात केंद्राचे पथक दाखल

nirbhid swarajya

ट्रकला दुचाकीची मागून धडक ; एक ठार एक जखमी

nirbhid swarajya

घटनेचे शिल्पकार श्रध्येय आंबेडकरांच्या वंशजाचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही:-देवेंद्रदादा देशमुख

nirbhid swarajya
error: Content is protected !!