खामगांव : आजच्या आधुनिक, वैज्ञानिक युगात पारंपरिक व्यवसाय, उद्योगात अनेक नवनवीन बदल पाहायला मिळतात, ज्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून थंड पिण्याच्या पाण्यासाठी फ्रीज आले , आरओ फिल्टर आले मात्र मातीचे माठ, मटके, रांजण याची क्रेज काही कमी झाली नाही.सध्या बाजारात गरिबाच फ्रीज मानले जाणारे मातीचे माठ, राजन विक्रीसाठी आले आहे, मात्र कोरोनामुळे या कुंभार व्यवसायावर मंदी पाहायला मिळत आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने गरिबांचा फ्रीज समाजाला जाणारा मातीचा माठ, रांजण बाजारात विक्रीला आले आहेत, शहरी भागात याची मागणी कमी झाली असली तर मात्र ग्रामीण भागात अजूनही याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील मातीच्या भांड्यातील पाणी पिण्यासाठी उपायकारक, थंड आणि चविष्ट असते, या व्यवसायाच्या स्पर्धेत फ्रीज, चिनी मातीचे भांडे, आरओ हे सर्व बाजारात आले.मात्र मातीच्या भांड्याची ख्याती कमी झाली नव्हती, मात्र गेल्या वर्षभरा पासून लॉकडाऊन मुळे लोकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने आर्थिक चणचण लोकांकडे असल्याने प्रत्येक वर्षी तुलनेत या वर्षी नवीन माठ रांजण घेण्याचे नागरिक टाळत असून त्यांच्याजवळील जुन्याच मातीच्या भांड्यावर भागवत आहेत, सध्या बाजारात गरिबाच फ्रीज मानले जाणारे मातीचे माठ, राजन विक्रीसाठी आले आहे, मात्र कोरोनामुळे या कुंभार व्यवसायावर मंदी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या पारंपरिक व्यवसायावर मंदी आल्याचे व्यावसायिकांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना सांगितले आहे.
previous post