December 14, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

भाजपा उमेदवाराचे प्रचारार्थ व नियोजनार्थ आ.फुंडकर पश्चिम बंगाल रवाना

अत्यंत प्रसिध्द़ व महत्वपुर्ण विधानसभा क्षेत्राची जबाबदारी आ.फुंडकरांवर

खामगांव : भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार यांची खामगांव विधानसभा मतदार संघावर असलेली मजबूत पकड व दुसऱ्यांदा विजयी नेतृत्व़ सिध्द़ केले. त्यांच्या कतृत्वाची पावती देत पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्ष पद दिले व आता भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत महत्वाची समजल्या जाणारी पश्चिम बंगाल निवडणुकीत त्यांच्यावर काही मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी आमदार ॲड.आकाश फुंडकर हे आज पश्चिम बंगाल येथील नवदीप या विधानसभा मतदार संघाकडे रवाना झाले. खामगांव विधानसभा मतदार संघात लोकनेते स्व़.भाऊसाहेब फुंडकर यांचा छावा समजल्या जाणारे आमदार ॲड आकाश फुंडकर हे नव्या जबाबदारी सोबत पश्चिम बंगाल साठी रवाना झाले यावेळी खामगांव शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष राम मिश्रा व भारतीय जनता युवा मोर्चा शहर संघटक नगेंद्र रोहनकार हे देखील त्यांच्यासोबत पश्चिम बंगालसाठी रवाना झाले. नवव्दीप हे पश्चिम बंगाल मधील नदीया जिल्हयातील एक महत्वपुर्ण धार्मिक स्थ़ळ आहे.भागीरथी आणि जलांगी या दोन नदयांच्या संगमावरील कृष्ण नगरच्या जवळ हे प्रसिध्द़ नगर आहे. हिंदुचे एक प्रसिध्द़ तिर्थक्षेत्र आहे. इ.स.१४८५ मध्ये श्री चैतन्य़ महाप्रभु यांचा जन्म़ येथे झाला होता. तसेच हा परिसर धातुचे व मातीचे भांडे बनविण्यासाठी प्रसिध्द आहे. अशा या अत्यंत महत्वाच्या व प्रसिध्द़ अशा विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचार आणि नियोजना साठी पक्षाने ने दिलेली ही जवाबदारी अत्यंत महत्वाची असून आपल्यावर पक्षाने दाखविलेल्या विश्वासावर नक्की खरे उतरुन नवव्दीप येथील उमेदवार प्रचंड बहुमताने निवडुन येतील अशी खात्री आहे असे आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले.

Related posts

नॅशनल हायस्कूल व जुनिअर कॉलेजची कु.स्नेहल ढोले प्रथम तर श्रीकृष्ण तोंडे दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण

nirbhid swarajya

माजी सरपंच विरिद्ध संतोष येवले विरुद्ध गुन्हा दाखल…

nirbhid swarajya

पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत विदर्भात पहिला गुन्हा दाखल… बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये गुन्हा दाखल…एक आरोपी अटक तर दोन फरार…

admin
error: Content is protected !!