January 1, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ

शहरात दोन ठिकाणी पकडला लाखोंचा गुटखा

शहरात गुटखा विक्री जोमात

खामगांव : शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे खामगाव शहरातील दोन विविध ठिकाणी गुटखा पडल्याची घटना घडली आहे. भुसावळ चौकातून मोटार सायकल वरून गुटका घेऊन जात असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून आज १९ मार्च रोजी भुसावळ चौक येथून दुचाकी क्रमांक एम एच-२८-ए डी-८४५० वरून श्याम सुरेश घाटे वय १९ रा. बोबडे कॉलनी याने जीवितास अपायकारक असा व संसर्ग पसरविण्यास कारणीभूत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित गुटखा घेऊन जाताना शहर पोलिसांना मिळून आला. त्याच्या जवळील शैलीची झडती घेतली असता त्यामध्ये पान बहार कंपनीचा प्रतिबंधीत गुटखा एकुन ४ नग पाकीटे, प्रत्येकि नग २०० रू.प्रमाने एकुन किमती ८०० रू.चा विमल पान मसाला कंपनीचा प्रतिबंधीत एकुन २६ नग पाँकीट, प्रत्येकि नग १८० रु. ४६८० विमल तम्बाखु कंपनीचा प्रतिबंधीत गुटखा एकुन २६ नग पाकिटे प्रत्येकि नग ३२ रू प्रमाने एकुण ८५०/-रू. केशरयुक्त विमल पान मसाला कंपनीचा प्रतिबंधीत गुटखा एकुन २० नग लालसर ताबंडा पाकिटे प्रत्येकि नग १९८ रू प्रमाने एकुन ३९६० रू केशरयुक्त विमल पान मसाला कंपनिचा प्रतिबंधीत गुटखा एकुन ५० नग हिरवट फिका पाकिटे प्रत्येकि नग १२० रू प्रमाने एकुन ६०००/- रू व्हि-१ सुगंधीत तंबाखुचे च्या एकुन २० नग पाकिटे प्रत्येकि नग २२ रू प्रमाने एकुन किमती ४४० रू व्हि-१ सुगंधीत तंबाखुचे च्या एकुन ५० नग पाकिटे प्रत्येकि नग ३० रू प्रमाने एकुन किमती १५००/-रू , वाह च्युइंगम तंबाखु च्या एकुन ४ नग पाकिटे प्रत्येकी नग १५/-रु. प्रमाणे एकुन ६०/-रु.,वाह पान मसाला च्या एकुन ४ नग पाकिटे प्रत्येकी नग १२० /- रु. प्रमाणे एकुन ४८०/-रु. HF डिलक्स कंपनीची मोसा. क्र MH-२८-AD-८४५० किमंत अंदाजे ३००००/-रु. त्याच्या जवळून 1 ७७० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी श्याम घाटे विरुद्ध भादवि कलम १८८,२६९,२७०,२७२,२७३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजीतसिंग ठाकूर करीत आहे. तर दुसऱ्या घटनेमधे सरकी लाइन मधील एका दुकानात अवैध गुटखा साठवला असल्याची माहिती शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांना मिळाली होती. मिळालेल्या महितीच्या आधारे आज दुपारी ५ वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी शहर पोलीस स्टेशन ठाणेदार सुनील अंबुलकर व कर्मचारी यांनी धाड टाकली असता दुकानामधे लाखो रुपयांचा गुटखा (६ पोते ) साठवून ठेवल्याचे आढळून आले. सर्व गुटखा जप्त करून शहर पोलीस स्टेशनमधे आणण्यात आला आहे. तसेच वृत्त लिहीपर्यंत पुढील कारवाई सुरू होती. कालच महाराष्ट्र शासनाचे अन्न व प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मागणी केली होती की गुटखा विक्री करणाऱ्यांना जामीन मिळू नये,आणि गुटखा विक्रिचे केंद्रबिंदु असलेल्या खामगाव मध्ये आज दोन वेळा गुटखा पकडण्यात आला आहे. यावरून एकच लक्षात येते की पालकमंत्री डॉ.शिंगणे यांच्या जिल्ह्यातच अवैधरीत्या गुटखा विक्री जोमात सुरू आहे. गुटखा विक्री करणाऱ्यांवर नेमके अभय कोणाचे ? अशी चर्चा खामगाव मधील नागरिकांमध्ये सुरू आहे.

Related posts

बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने बँके कडे केली 5.5 कोटी कर्ज मागणी…

nirbhid swarajya

शेगाव चे कोविड रुग्णालय निव्वळ देखावा: शेगांव संघर्ष समितिचा आरोप

nirbhid swarajya

खामगांवात सीसीआय चे तीन खरेदी केंद्र सुरु

nirbhid swarajya
error: Content is protected !!