January 6, 2025
गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

बुलढाणा तालुक्यातील हतेडी खुर्द गावात आढळले दोन मृतदेह

बुलढाणा : तालुक्यातील हतेडी खुर्द गाव शिवारातील एका विहिरीत सकाळी आई-आणि मुलाचे मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असू हि हत्या कि आत्महत्या याबाबत पोलीस तपास करीत आहे. गावातील एका महिलेने आपल्या पोटच्या गोळ्यासह एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांचे विहिरीत एकमेकाला बिलगून तरंगणारे मृतदेह पाहून गावकरी हादरले. बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन चे कर्मचारी पोहचल्यावर पंचनामा, मृतदेह बाहेरकाढण्यात आले. रुपाली हरिदास चव्हाण वय २६ व समर्थ हरिदास चव्हाण वय ६ अशी या दुर्दैवी मायलेकांची नावे आहेत. काळ बुधवारी सायंकाळपासून दोन्ही जण बेपत्ता होते. यात आज सकाळी त्यांचे मृतदेह शिवारातील गट क्रमांक २४ मधील सीताराम चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत आढळले.

Related posts

यावर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार पाचव्या सोमवारी निघणार बुलडाणा जिल्ह्यातील ऐतिहासीक

nirbhid swarajya

सोमठाणा येथील विषबाधेची परिस्थिती नियंत्रणात

nirbhid swarajya

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक; उपचार सुरु

nirbhid swarajya
error: Content is protected !!