July 21, 2026
जिल्हा नांदुरा बुलडाणा

मुलीचा वाढदिवस केला आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा

नांदुरा : तालुक्यातील वाडी येथे पत्रकार शिवाजी चिमकर यांची मुलगी कु. जान्हवी शिवाजी चिमकर या चिमुकलीचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. हा वाढदिवस चक्क टरबूज कापून साजरा करण्यात आला आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळण्यासाठी सर्वांनी असा आदर्श घेतला तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल. नांदुरा तालुक्यातील कदाचित ही पहिलीच घटना असेल. यावेळी माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सदाशिव चोपडे, वाडी येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष गजेंद्र देशमुख, पंढरी चिमकर, सुरेंद्र देशमुख, प्रल्हाद धुरंधर ,रामचंद्र धुरंधर ,भगवान चिमकर ,कडू जवरे, गजानन दळवी, राजेंद्र देशमुख , निवृत्ती फाळके, जनार्दन वाकोडे, माजी उपसरपंच , सुरेश धुरंधर, महादेव खोडके, पुरुषोत्तम शेलकर, गणेश देशमुख, अक्षय खोडके, नवल सपकाळ, मंगेश खोडके,वैभव चिमकर, गोपाल दळवी, कैलास चिमकर, महादेव चीमकर यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

Related posts

शिवजयंती साधेपणाने साजरी करावी – पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

nirbhid swarajya

बुलडाणा शहर आता सील करण्याचा निर्णय

nirbhid swarajya

जळगाव : शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांना धक्का, जात प्रमाणपत्र अवैध

nirbhid swarajya
error: Content is protected !!