January 6, 2025
गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र शेगांव

वसीम रिझवी विरोधात शेगावात निवेदन

अहले सुन्नत कडून दिले निवेदन

शेगाव : कुरानमधील 26 आयत दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे सांगत ही 26 आयत हटवण्यासाठी मनोविकृत असलेल्या वसीम रिझवी नामक इसमाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. असे करून रिझवी याने समस्त मुस्लिम बांधवांच्या भावनेला ठेच पोहचवली असून त्याचे विरोधात शेगावात अहले सुन्नत समितीच्या वतीने कारवाई साठी हाफिज शमशाद हुसेन यांच्या नेतृत्वात बुधवारी पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यलयात निवेदने देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लखनऊ येथील मनोविकृत इसम वसीम रिजवी या व्यक्तीने संपूर्ण जगात मानल्या जाणाऱ्या पवित्र कुराण या ग्रंथावर टीकाटिपणी करून त्यामधील काही भाग हटवण्याची मागणी करून समाजात गालबोट लावण्याचे काम केलेले आहे. याशिवाय प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरही टीकाटिप्पणी केली असून अशी टिप्पणी कदापिही मुस्लिम समाज सहन करणार नाही. त्यामुळे समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या वसीम रिजवी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शेगाव येथील दारुल उलूम गौसे आजम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह अहले सुन्नत समितीच्या वतीने हे निवेदन शेगावचे ठाणेदार संतोष ताले आणि तहसीलदार शिल्पा बोबडे यांना देण्यात आले.

Related posts

बहूप्रतिक्षित मान्सून विदर्भात दाखल

nirbhid swarajya

चांदमारी येथे जुगारावर अडड्यावर धाड; चोर सोडून सन्यासाला फाशी

nirbhid swarajya

क्वारंटाईन करण्यासाठी राखीव ठेवलेल्या रुग्णालयाची दुरावस्था

nirbhid swarajya
error: Content is protected !!