खामगांव : मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्यां दोघांना आज पोलिसांनी अटक केली आहे. सदर कारवाई ही १५ मार्च रोजी खामगाव शेगाव रोड वरील वरखेड फाटा परिसरात करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की खामगाव शहर पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथक गस्त घालीत असताना पथकास खामगाव शेगाव मार्गावरील वरखेड फाटा परिसरात मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्यासह गुन्हे शोध पथकाने सापळा रचून खामगाव शेगाव मार्गावरील वरखेड फाट्यावर दोघेजण मांडूळ जातीचा सापाची तस्करी करताना त्यांना दिसून आले. यावेळी पोलिसांनी शेख इरफान शेख बाबू वय ३० रा.अहमदाबाद ह.मु. वरखेड ता.शेगाव व शेख नसीर शेख गफूरवय ३९ रा. वरखेड ता.शेगाव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक विभाग कामगार यांच्या स्वाधीन करण्यात आले. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गौरव सराग ,पोहेका गजानन बोरसे, नापोका राजेंद्र टेकाळे,सुरज राठोड पोका.जितेश हिवाळे, दीपक राठोड,अमरसिंग ठाकूर,प्रफुल टेकाळे यांनी केली आहे.