November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी बुलडाणा महाराष्ट्र

भुखंड घोटाळ्यातील आरोपी प्रदीप राठी यांच्या विरूध्द आणखी एक गुन्हा दाखल

खामगाव : शहरातील बहुचर्चित भूखंड घोटाळ्यातील आरोपी तसेच हॉटेल व्यवसायिक प्रदीप राठी याच्यावर नकली मुद्रांक बनावट दस्तऐवजाद्वारे खरेदीखत नोंदवून भूखंड घोटाळा केल्याप्रकरणी यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. काल १५ मार्च रोजी खामगांव शहर पोलीस स्टेशन मधे प्रदीप राठी याच्यावर फसवणूकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रीमती रेखा भगीरथ अग्रवाल (५५) रा. देशमुख प्लॉट यानी पोस्टेला दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, त्यांचे पती भगीरथ नगीनदास अग्रवाल याचे नावाने खरेदी करून दिलेला प्लॉट नं ८९ क्षेत्रफळ ३४० चौ भुखंड जुना शेत नं १३६ अकृष आदेश नं NAP -३४/०१/८२-८३ असा असलेला प्लाँट हा आरोपी याने परस्पर विश्वासघत करून बेकायदेशीर पणे प्लॉट चे विभाजन
करून परस्पर इतर तिघांना विकुन बनावट पणे स्वतःचा प्लाँट असल्याचे भासवुन अग्रवाल यांची २५ लाखाने फसवणुक करून विश्वासाघात केला. या तक्रारीवरून राठी यांच्या विरुध्द कलम ४२० भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा बुलडाणा यांचे कडे देण्यात आला आहे.

Related posts

कंपनी , कंत्राटदारानी परप्रांतीय मजुराना सोडले वाऱ्यावर

nirbhid swarajya

अखेर श्री “गणेश” झाला हेडक्वार्टर अटॅच..

nirbhid swarajya

नगरपालिकेच्या तक्रारी वरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya
error: Content is protected !!