January 4, 2025
अमरावती जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र

बुलडाणा जिल्हा उपनिबंधक यांची अमरावतीला बदली

पदभार न सोडल्यामुळे कार्यमुक्त होण्याचे विभागीय सहनिबंधकांचे आदेश

बुलडाणा: बुलडाणा जिल्हा उपनिबंधक पदावर कार्यरत असणारे महेंद्र चव्हाण यांची अमरावती प्रादेशिक उपसंचालक (साखर) रिक्त पदावर बदली करण्याचे आल्याचे आदेश सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव म.ग.जोशी यांनी ९ मार्च रोजी बदलीचे निर्गमित केले आहे.९ मार्चपासून ११ मार्चपर्यंत जिल्हा उपनिबंधकाचा पदभार न सोडल्यामुळे शुक्रवारी १२ मार्चच्या संध्याकाळी पर्यंत कार्यमुक्त होवून सध्याचा प्रभारी पदभार साहाय्यक उपनिबंधक आर.एल.राठोड यांना देण्याचा आदेश शुक्रवारी १२ जानेवारीला अमरावतीच्या सहकारी संस्थाचे विभागीय सहनिबंधक राजेंद्र दाभेराव यांनी बुलडाणा जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांना दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड उपनिबंधक पदावरून महेंद्र चव्हाण हे बदलून बुलडाणा जिल्हा उपनिबंधक पदावर ऑगस्ट २०१९ रोजी बुलडाण्यात रुजू झाले होते.तेव्हा पासन ते बुलडाण्यात कामकाज करीत होते.त्यांच्या कार्यकाळ सावकारांच्या विरोधात अनेक तक्रारींच्या निरासकरण करण्यात आले नाही.अनेक तक्राऱ्या त्यांच्या कार्यकाळात निकाली काढल्या गेले नाही.दरम्यान २० महिन्याच्या कार्यकाळानंतर त्यांची बदली अमरावती येथील प्रादेशिक उपसंचालक (साखर ) या रिक्त पदावर सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव म.ग.जोशी यांनी ९ मार्च रोजी केली आहे.दरम्यान ९ मार्च रोजी बदली करण्यात आली असतांना महेंद्र चव्हाण कार्यमुक्त न झाल्याने १२ मार्चच्या संध्याकाळी पर्यंत कार्यमुक्त होवून सध्याचा प्रभारी पदभार साहाय्यक उपनिबंधक आर.एल.राठोड यांना देण्याचा आदेश शुक्रवारी १२ जानेवारीला अमरावतीच्या सहकारी संस्थाचे विभागीय सहनिबंधक राजेंद्र दाभेराव यांनी बुलडाणा जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांना दिले आहे.
बदली झाल्यानंतर कार्यमुत होण्याच्या शुक्रवारी १२ मार्चच्या दिवशी जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी मेहकर तालुक्यातील दोन सावकारांच्या विरोधात झालेल्या तक्रारींच्या सुनावणी घेतल्या.ही सुनावणी घेतांना संपूर्ण कार्यालयात चर्चा होती की,सुनावणी घेण्यात आलेल्या तक्रारीपेक्षा जुन्या तक्रारी प्रलंबित असून त्या प्रलंबित तक्राऱ्यांच्या सुनावणी घेतली गेल्या नाही.फक्त मर्जीतील तक्रारींची सुनावणी घेण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.जिल्ह्यातील दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याने तिथे काम करणाऱ्या ७०० च्यावर साखर कामगारांचे वेतन अनेक वर्षांपासून पासून रखडलेले आहे.वेतन दिल्यासंबंधी कारखान्यातील साखर विकलेल्या रकमेतून सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर वेतन देण्याचा मार्ग मोकळा झाला असतांनाही कामगारांना जवळपास ३ कोटी ७५ लक्ष थकीत वेतन मिळाले नसल्याने जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयासमोर कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते.दरम्यान दुपारी बैठकीला जात असलेल्या जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांना कामगारांनी लोटपाट करून मारहाण केल्याची घटना घडली होती.याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.यामुळे महेंद्र चव्हाण चर्चेत आले होते.

Related posts

लहान मुलांवरील कोविड उपचारांसाठी बाल रोग तपासणी कक्ष तयार ठेवावे – पालकमंत्री डॉ. शिंगणे

nirbhid swarajya

नमाज अदा करण्याकरिता जमलेल्या मुस्लिम समाजाच्या लोकांवर ठाणेदारांनी केली कारवाई

nirbhid swarajya

स्वाब न देताच रिपोर्ट आला कोव्हिड पॉजिटिव्ह…

nirbhid swarajya
error: Content is protected !!