शेगांव : अण्णा भाऊ साठे नगर (म्हाडा ) कॉलनी येथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. इथल्या नाल्या दोन- तीन महिने साफ केल्या जात नाही. सदर बाबी कडे नगर परिषदेचे दुर्लक्ष झालेलं आहे. अण्णा भाऊ साठे नगर मध्ये होणारे घाण केरकचरा नाल्यांच्या काठावर उगवलेले गवत काळ्या तुबलेल्या नाल्या स्वछ करण्याकरिता कोणतेही सफाई कामगार नेमलेले नाहीत असे दिसून येते.या बाबद लहुजी शक्तीसेनेचे जिल्हा अध्यक्ष आशिष सावळे यांनी न .प .शेगाव आरोग्य निरीक्षक हातेकर साहेब यांच्या शी संपर्क साधला असता यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. सदर विषय हा गंभीर स्वरूपाचा असून आरोग्याशी संबंधित आहे याचा दुष्परिणाम इथं राहत असलेल्या लहान मुलांवर व वयोरुद्ध यांच्या आरोग्यावर पडत आहे. सध्या कोरोना विषाणूचा होत असलेला फैलाव पाहता वातावरण आरोग्यदायी व स्वछ राहणे आवश्यक आहे. त्यामुळे नगर परिषेदेने सदर बाबी कडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ सफाई कामगारांची नेमणूक करून नियमित पणे सादर नाल्या तसेच परिसर स्वछ करण्या बाबत आदेश द्यावे अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
next post