April 18, 2025
आरोग्य जिल्हा

जिल्ह्यात आज प्राप्त 97 कोरोना अहवाल ‘निगेटीव्ह’; तर 6 पॉझीटीव्ह

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी तब्बल 103 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 97 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे मलकापूर येथील 60 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय पुरूष, 23 वर्षीय महिला, जळगांव जामोद येथील 50 वर्षीय पुरूष, शेगांव येथील 58 वर्षीय महिला व नांदुरा येथील 45 वर्षीय पुरूष रूग्णाचे आहे. जिल्ह्यात सध्या सिंदखेड राजा, बुलडाणा, मोताळा, चिखली, दे.राजा तालुके कोरोनामुक्त असून या तालुक्यात कोरोनाचा एकही रूग्ण उपचार घेत नाही. आतापर्यंत 95 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 95 आहे.  सध्या रूग्णालयात 48 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.  तसेच आतापर्यंत 2049 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 148 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे. तसेच आज 19 जुन रोजी 103 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 6 पॉझीटीव्ह, तर 97 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  98 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2049 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे

ReplyForward

Related posts

प्रेम प्रकरणातून युवकावर प्राणघातक हल्ला

nirbhid swarajya

पलढग धरणाच्या जलाशयात दोन इंजिन बोटींचे उद्घाटन

nirbhid swarajya

कोतवालाला केलेल्या शिवीगाळाबद्दल कारवाई करण्याबाबतचे तहसीलदारांना निवेदन

nirbhid swarajya
error: Content is protected !!