भुसावळ नागपूर मार्गावरील गाड्यांचा समावेश
शेगाव : रेल्वेने दररोज दोनशे किलोमीटर पेक्षा अधिक पल्ला गाठणाऱ्या देशभरातील तब्बल 512 पॅसेंजर गाड्यांना एक्सप्रेस मध्ये परावर्तन करण्याची तयारी सुरू केली असून यामध्ये शेगाव नांदुरा मलकापूर होऊन जाणाऱ्या भुसावळ नागपूर भुसावळ वर्धा अशा चार गाड्यांचा समावेश आहे. रेल्वेने देशभरातील लोकप्रिय पॅसेंजर गाड्यांचा वेग वाढविण्याचे ठरविले असून यासाठी त्यांना एक्स्प्रेस’मध्ये कर परावर्तित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दररोज 200 किलोमीटरपेक्षा अधिक पल्ला गाठणाऱ्या पॅसेंजर एक्स्प्रेस’मध्ये परावर्तित करण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्यांचा वेग तर वाढेलच शिवाय नंतर घटनेची सरासरी वेळ एक ते दोन तासांनी कमी होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गरज पडल्यास या गाड्यांच्या थांब्याची संख्याही कमी करण्यात येणार असून टिकीटात बदल करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे . एक्स्प्रेस’मध्ये परावर्तित होणाऱ्या गाड्यांमध्ये रेल्वेच्या सर्वच जोन मधील पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे.