April 19, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

30 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

खामगाव : येथून जवळ असलेल्या सुटाळा बु. शिवारात असलेल्या बोर्डी नदीजवळ विनोद वाघमारे या युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ३ वाजता उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार सुटाळा बु. येथील विनोद शंकर वाघमारे वय 30 हा दोन दिवसापासून येथील सामान्य रुग्णालयात मध्ये सर्दी खोकला व ताप असल्याने भरती झाला होता. आज सकाळी दवाखान्यातून कोणालाही न सांगता निघून आला व आणि अनिकट रोडवरील बोर्डी नदी जवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

सुटाळा गावातील काही मुले या नदीवर आंघोळीसाठी आलेले असतात सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला.गावकऱ्यांनी याची माहिती शिवाजी नगर पोलिस स्टेशन ला दिली,घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर चे एपीआय धीरज बांडे, संतोष इटमल्लू,प्रदीप मोठे,अनिल शिंदे,गणेश सोलाट घटनास्थळी दाखल झाले होते.पोलिसांनी सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.विनोदचा भाऊ भागवत वाघमारे याने सुद्धा काही महिन्यांपूर्वी घराजवळ गोठ्यामध्ये आत्महत्या केली होती.त्यानंतर विनोद हा अस्वस्थ सुद्धा राहत होता. मात्र विनोद याने आत्महत्या कुठल्या कारणामुळे केली हे मात्र अद्याप पर्यंत कळू शकले नाही. या घटनेमुळे संपूर्ण सुटाळा बु.गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या नातेवाईकानी दिलेल्या फिर्यादिवरून शिवाजी नगर पोलिसांनी कलम १७४ नुसार जा.फ़ौ.नुसार मर्ग दाखल केला असून पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहे.

Related posts

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये विद्यार्थी स्वयंप्रशासन व शिक्षकदिन साजरा…

nirbhid swarajya

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते ध्वजारोहण

nirbhid swarajya

जिल्ह्यातील लॉक डाऊन नियमात बदल

nirbhid swarajya
error: Content is protected !!