राज्यातील पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्याच्या पूर्ततेसाठी नागपूर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनावर पोलीस पाटलांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील पोलीस पाटील यांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस पाटलांच्या प्रमुख आठ संघटनांच्या राज्यप्रमुखांनी संयुक्त कृती समितीची स्थापना करून सदर मोर्चाचे आयोजन केले आहे यात असोसिएशनचे महादेव नागरगोजे पंढरीनाथ पाटील दीपक पालीवाल डी. पी .जाहागीरदार प्रवीण दाक्षे दिलीप आबा पाटील अंकुश उंद्रे संतोष देशमुख राज्य समन्वयक माऊली मुंडे पाटील राहुल उके नंदू हिवसे रुपेश सावरकर सीमाताई वारघडे एकीकरण समितीचे प्रकाश खेडेकर सुजय देशमुख अण्णासाहेब कोळेकर यांचा समावेश आहे .दरम्यान खामगाव तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बंधू भगिनींनी या मोर्चात मोठ्या प्रमाणात सामील व्हावे असे आवाहन खामगाव तालुकाध्यक्ष महादेवराव अवचार पाटील जिल्हा संघटक किशोर अंभोरे पाटील खामगाव तालुका कार्यकारी अध्यक्ष विनोद चव्हाण जिल्हा सचिव राजाभाऊ लोखंडकार सुरेश भिसे गणेश टिकार पाटील महादेव पाटील कंचनपूर एकनाथ वेरुळकर तालुका प्रसिद्धीप्रमुख संतोष मोरे यांनी आवाहन केले आहे .