खामगाव : जनुना तलाव परिसरात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन१९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार जनुना येथील शिवाजी अंबादास हरमकार वय २२ रा.ह्याचा काल सकाळी घरच्यांसोबत वाद झाला होता,त्याच रागाच्या भरात तो संध्याकाळी तो घरातून निघुन गेला होता.आज सकाळी जनुना तलाव जवळ असलेल्या नींबाच्या झाडाला दोरिच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह खाली काढुन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणी भाऊ पुरुषोत्तम गजानन हरमकार यांनी शिवाजी नगर पोलिस दिलेल्या फिर्यादिवरुन मर्ग ची नोंद केली असुन पुढील तपास पोहेका नन्हेखा तड़वी करीत आहे.
previous post