खामगाव:- सध्या संपूर्ण जगभरामध्ये कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक रुग्ण ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असलेले रुग्ण सामान्य रुग्णालयामधे उपचार घेत असतात. उपचार घेत असतानाच त्यांची प्रकृती कधीकधी खालावत असते,अश्या वेळी खामगाव येथून अकोला येथे जाण्याकरिता 108 रुग्णवाहीकेला रुग्णांचे नातेवाईक दूरध्वनी करत असतात.मात्र 108 रुग्नवाहिकेच्या चालकाच्या मनमानी कारभारामुळे सदर रुग्णवाहिका ही जवळच परिसरातील असलेल्या नांदुरा,शेगाव,रोहना, जवळा बु येथील रुग्णवाहिका पाचारण करण्यात येते.मात्र नातेवाईकाना आपल्या पेशंटला तात्काळ अकोला येथे रेफर करायचे असते.आणि रुग्णवाहिका सामान्य रुग्णालयात तीन ते चार तास उशिरा येते. यामध्ये अजून रुग्णाची प्रकृती खालावली जाते व त्याचा मृत्यूदेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असाच एक प्रकार गेल्या पाच दिवसापूर्वी सामान्य रुग्णालयात झाला आहे. खामगांव सामान्य रुग्णालयात एका 38 वर्षीय इसमाला त्रास होत होता. या इसमाला सामान्य रुग्णालय खामगाव येथून अकोला येथे जाण्याचे सांगितले होते, त्या रुग्णाच्या नातेवाइकांनी साडे आठ वाजता रात्री रुग्णवाहिकेसाठी 108 या क्रमांकावर फोन केला होता, मात्र ही रुग्णवाहिका रात्री साडेबारा वाजता या ठीकाणी आली व रुग्णाला घेऊन गेली यानंतर या रुग्णाचा अकोला येथील रुग्णालयात 2 तासात मृत्यु त्याच दिवशी मृत्यू झाला.आज सुद्धा एका महिलेची प्रसूती मुळे तबियत खराब झाली होती. सामान्य रुग्णालयाच्या परिचारिकेने 108 च्या एम्बुलेंस ला दुपारी 11:30 वाजता फ़ोन केला,मात्र जाणून बुजून 108 रुग्नवाहिकेच्या चालकाने रोहणा आरोग्य केंद्र येथून खामगांव पर्यंत येण्याकरीता 3 तास लावले. आणि आल्यावर डॉक्टरांना सांगून डिजेल भरायला गेला. व आलाच नाही.त्ये महिलेची प्रसूती खामगांव येथेच करण्यात आली. पेशंटच्या नातेवाईकानी रुग्नवाहिकेच्या चालकाला विचारले असता सांगितले की मी कोलोरी येथील पंम्पावर डिजेल भरायला आलो आहे. वास्तविक पाहता डिजेल भरायला खामगांव मधून 12 किमी.जाणे हे कुठेतरी चुकीचे वाटत आहे. आणि ते पण एखाद्या पेशंटची तबियत जास्त खराब असताना.असेच प्रकार जर घडत राहीले तर लोकांना वाचवनारी रुग्णवाहिका असे लोक म्हणायच्या ऐवजी लोकांचा जीव घेणारी रुग्नवाहिका म्हणावे लागेल.प्रशासनाने तात्काळ या रुग्नवाहिकेच्या चालकांवर कारवाई करावी. अन्यथा एखाद्या पेशंटचा रुग्नवाहिकेच्या चालकाच्या उशिरा येण्यामुळे मृत्यु झाला तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रुग्णाचे नातेवाईक करत आहे. व याचे उत्तर सुद्धा प्रशासनाला द्यावे लागेल. या कडे जसा पालकमंत्री यांनी 2 दिवसा पहिले काही कडक निर्णय घेतले तसेच कठोर निर्णय बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घ्यावा.तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी गांभीर्यने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी नाहीतर तर अनेक रुग्ण दगावल्या जातील एवढे मात्र खरे……..