April 11, 2025
अमरावती खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ

10 लाख किंमतीचा 1 किंटल गांजा पकडला….

अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या पथकांची कारवाही…..

खामगाव : अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या पथकाने अवैध धंद्याच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून दररोज अशा व्यवसायांवर कारवाई केल्या जात आहे दरम्यान आज परराज्यातून बुलडाणा जिल्ह्यात आलेला 10 लाख रुपये किमंतीचा 1 विक्टल गांजा बुलडाणा पोलिसांनी पकडला आहे याप्रकरणी पोलीसांनी 3 जणांना अटक केली आहे अटक केलेल्या तिघांपैकी एक महिला आहे

परराज्यातून हे तिघे जण बुलढाणा जिल्ह्यात गांजा घेऊन येत असताना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव फाटयाजवळ रात्री 3 वा नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी त्यांना थांबले असता त्यांच्या जवळुन 10 लाख रु किंमतीचा एक क्विंटल गांजा जप्त केला आहे या प्रकरणी तीन व्यक्तींविरुद्ध बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून तिन्ही आरोपी अटक करण्यात आले सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया ,अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी. गोकुळ सूर्यवंशी,पोउनि. पंकज सपकाळे,पोहेका. गजानन बोरसे. पोना.गजानन आहेर, रघुनाथ जाधव, संदीप टाकसाळ सर्जेस उन्हाळे, पोका. राम धामोडे,मपोका. अनिता गायकी,निर्गुणा सोनटक्के सपोनि सायबर सेलचे पोलिस नाईक नंदकिशोर आंधळे, राजू आडवे, पोलिस कर्मचारी कैलास ठोंबरे यांनी केली. तपास हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन वाघ व त्यांच्या पथक करत आहे.

Related posts

जिल्ह्यात प्राप्त 181 कोरोना अहवाल निगेटीव्ह; 43 पॉझीटीव्ह

nirbhid swarajya

शेतकरी कुटुंबातील कु.प्रिया गोळे जेईई अँडव्हान्स परीक्षेत अकोल्यातून अव्वल

nirbhid swarajya

जलंब येथे रेतीची गाडी पकडली मांडवली करून सोडून दिली…

nirbhid swarajya
error: Content is protected !!