महाराष्ट्रातील ज्योतिषप्रेमीना उपस्थित राहण्याचे करण्यात आले आवाहन…
पूणे : श्री ज्योतिष संशोधन केंद्र (जळगाव )तर्फे पुणे शहरात ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन टिळक स्मारक मंदिर येथे ८ व ९ जून २०२२ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत होणार आहे.अधिवेशनाचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षी अधिवेशन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होते. अधिवेशन दोन दिवस चालणार असून या अधिवेशनामध्ये दोन दिवस ज्योतिष विषयक भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले असून अधिवेशनात तज्ञ मान्यवरांच्या व्याख्यानासह विविध पुरस्कारांचेही वितरणही केले जाणार आहे.यामध्ये ज्योतिष क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या पूणे येथील चंद्रकांत शेवाळे,डाँ. नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांना ज्योतिषी जीवन गौरव पुरस्कार तर औरंगाबादच्या चंद्रकला जोशी यांना आदर्श महिला ज्योतीर्विद पुरस्कार, सोलापूरचे देवदत्त जोशी आणि पूण्याचे भरत सटकर यांना ज्योतीश्री पुरस्कार प्रदान करण्यात ऐईल.डाँ.सौ.ज्योती जोशी यांच्या हिंदी भाषेतील अनुवादित ज्योतीष विषयावरील तीन पुस्तकांचे प्रकाषन मान्यवरांच्या हस्ते करण्यात ऐईल.अधिवेशनात 10 संस्थांचा सहभाग राहणार आहे. अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून ज्योतिषप्रेमी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अभिजित प्रतिष्ठान, दि इन्स्टिट्युट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट मुंबई व प्रा.रमणलाल शहा सर्च ॲण्ड रिसर्च ज्योतिष सेंटर, सातारा यांचे सहकार्य या अधिवेशनाला लाभत असून संपूर्ण महाराष्ट्रातील दहा ज्योतिष संस्थांचा सक्रिय सहभाग यात आहे. ज्योतिषशास्त्राचा प्रचार-प्रसार करण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ.सौ. ज्योती जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी आनंद दवे ( अध्यक्ष हिंदू महासंघ ),सुनील पुरोहित (अभिजित प्रतिष्ठान )ईत्यादी मान्यवर सुद्धा पत्रकार परिषदेत उपस्थित होते.