खामगाव : येथून जवळ असलेल्या एमआयडीसी परिसरातून अवैधरित्या तस्करी केल्या जाणारा गांजा शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या वाहतुक शाखेचे कर्मचारी यांनी पकडला आहे. निर्भिड स्वराज्यला मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी आंध्रप्रदेश मधून पिंपळगांव राजा कडे घेऊन जात असलेला अवैधरीत्या गांजा एमआयडीसी मधून वाहतुक करताना जप्त केला आहे. एपी-२७-क्यु-६१३३ या महिंद्रा मॅक्स या गाडीमधून अवैधरित्या गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती, त्याच्या आधारे वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून स्थानिक एमआयडीसी पोलीस चौकी समोर गांजा घेऊन जाणारे वाहन पकडले आहे. यामधून गांजाचे ५ पोते वजन ८५ किलो अंदाजे किंमत २ लाख ५५ हजार व चारचाकी वाहनासह ५ ते ६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.निर्भिड स्वराज्यला सुत्राने दिलेल्या माहितीनुसार शिवाजी नगर पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे.व पुढील कार्यवाही शिवाजीनगर पोलीस करत असल्याची माहिती ठाणेदार सुनील हुड यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना दिली आहे.