खामगांव : येथील सिव्हिल लाइन राठी प्लॉट येथे ६८ वर्षीय इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिव्हील लाईन राठी प्लॉट भागातील विनयकुमार विजयकुमार लढ्ढा वय ५६ यांचे काका पुरुषोत्तम लक्ष्मीनारायण लढ्ढा वय ६८ पत्नीसह दोघे घरी राहतात. तर आज मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास मृतक हे घराबाहेर गेले होते तर उशिरा पर्यंत घरात न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला परंतु मिळून आले नाही. नातेवाईकानी याची माहिती शहर पोलिसांना दिली. शहर पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली अखेर मृतक यांच्या नातेवाईकांनी आपल्या घरातील विहिरित डोकाऊन पाहिले असता प्रेत पाण्यात तरंगता दिसुन आले.तात्काळ पोलिसांनी मृतक यास बाहेर काढले व घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदनास पाठवले. मृतक यांची मानसिक स्थिती चांगली नसून त्यांचा नागपूर येथे उपचार सुरू होता असल्याचे समजते. याप्रकरणी मृतक यांचा पुतण्या यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे प्रकाश वसतकार व श्रीकांत देशमुख करीत आहे.