खामगांव : येथील तायडे कॉलनी समोरील फादर यांच्या बंगल्या जवळ एका ४८ वर्षे इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारच्या उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तायडे कॉलनी फादर यांच्या बंगला जवळील विजय घ्यार वय ४८ हे आज सकाळी आपल्या टॉवर चौक येथे असलेली चहा दुकान बंद करून घरी आले होते. त्यानंतर आज दुपारी एक वाजताच्या सुमारास घरातील सर्व कुटुंब घरातील कामात व्यस्त असताना त्यांनी राहत्या घरासमोरील झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यांच्या आत्महत्या मागील नेमके कारण काय हे अद्यापही समजले नाही. तर त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विजय घ्यार यांचे टॉवर चौकात त्यांची चहाचे दुकान असल्याने ते सर्वांनाच चांगलेच परिचित होते. त्यांच्या जाण्याची बातमी कळताच त्यांच्या मित्र परिवाराला त्यांना सुद्धा धक्का बसला आहे. या घटनेमुळे तायडे कॉलोनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.