खामगाव : तालुक्यातील माक्ता-कोप्ता येथील ४० वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्रीच्या सुमारास उघडकीस आले आहे. खामगाव तालुक्यातील कोक्ता येथील ४० वर्षीय इसमाने मध्य रात्री ३:३० वाजताच्या सुमारास राहत्या घरासमोरील पिंपळाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत लटकलेला नातेवाईकांना दिसून आला.तात्काळ राजेश घनोकार यास खाली उतरवून खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. मृतक राजेश घनोकार यांच्या मुलीचा काही दिवसापूर्वीच साखरपुडा झाला असल्याची माहिती मिळाली आहे.या प्रकरणी वैद्यकीय अहवालावरून शहर पोलीस स्टेशन मध्ये मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. या आत्महत्ये मागील नेमके कारण काय आहे हे मात्र अद्यापही कळू शकले नाही.
previous post