खामगांव : ३५ वर्षीय इसमाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकिस आली.
मिळालेल्या माहिती नुसार चिंतामणी नगर भागातील संतोष जावूळकर (३५) याने स्वतःच्या घरातील पंख्याला दोरिच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी संतोष जावूळकर यांचा भाऊ त्यांना उठवन्यास गेला असता आतून बेडरूमचा दरवाजा लावलेला होता. तेंव्हा संशय आल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत गेले असता त्यांना संतोष हा गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते व शव खाली उतरवून पंचनामा करुन शवविच्छेदनास पाठविन्यात आले होते. अशी माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली आहे. संतोष जावूळकर यांनी आत्महत्या का केली याच्या मागील कारण कळू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास शिवाजी नगर पोलिस करीत आहे.