खामगांव : एका ३२ वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिवाजीनगर भागात घडली आहे. राजेश उत्तम डांमरे वय ३२ या इसमाने शिवाजीनगर भागात राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी पोहचले.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेहास शवविच्छेदनासाठी पाठविण्या आले .राजेश हा मजुरीचे काम करत होता, गेल्या एक वर्षापासून त्याची मानसिक स्थिती बरोबर राहत नसून अकोला येथे उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मयूर सुरेश घाडगे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास शिवाजिनगरचे नापोकाँ कडू बोरसे हे करीत आहेत.