November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

३० वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

खामगाव : तालुक्यातील चितोडा येथे तीस वर्ष इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील चितोडा येथील राष्ट्रपाल प्रल्हाद इंगळे वय ३० हा आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास झोपेतून उठून घरी कोणाला काही न सांगता घरून निघून गेला होता. तो घरात नसल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता सकाळी ८ वाजताच्या सुमारास राष्ट्रपाल इंगळे हा गावातीलच अशोक तुकाराम हिवराळे यांच्या शेतातील गोंधनाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसुन आला. घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेहास उतरवून शवविच्छेदनास सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी सिद्धार्थ महादेव तिडके यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम १७४ नुसार मर्ग दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपाल इंगळे याने आत्महत्या का केली या मागील नेमके कारण समजू शकले नाही. राष्ट्रपाल इंगळे याचा घटस्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ए एस आय आनंदा वाघमारे करीत हे करत आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 493 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 81 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

खामगाव राष्ट्रवादी तर्फे अब्दुल सत्ताराचा निषेध करत केले आंदोलन…

nirbhid swarajya

ब्रिस्टॉल न दिल्याने किराणा गोडाऊन लावली आग; लाखोंचे नुकसान

nirbhid swarajya
error: Content is protected !!