मुंबई : कोरोना सारख्या जागतिक महामारीमध्ये सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचनिमीत्ताने महाराष्ट्रभर रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र वतीने नवीन वर्षाच्या सुरूवातीला रक्तदात्याकडून रक्तदान करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य मिळून सर्व जिल्ह्यात खुप चांगल्या प्रकारे निष्ठेने व एकजुटीने काम करत आहेत, त्याचीच फलश्रुती म्हणुन येत्या 24 जानेवरी ते 30 जानेवारी दरम्यान रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र मार्फत संपूर्ण महाराष्ट्रामधे भव्य रक्तदान शिबिर आयोजन केले आहे. थेंबे थेंबे तळे साचे ह्या म्हणी प्रमाणे काम करून रक्तपेढी मध्ये रक्ताचा साठा जमा करण्यास मदत करून सामाजिक कर्तव्य पार पाडनार आहे. आज याची सुरुवात कोल्हापुर येथील शाहुवाडी येथून करण्यात आली तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील बावडा येथे करण्यात आली.
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र, आयोजित रक्तदान शिबिर जिल्हा निहाय माहिती :
1) कोल्हापूर टीम : दि. 24 जानेवारी,शाहूवाडी कोल्हापूर
2) सातारा टीम : दि. 24 जानेवारी बावडा, ता खंडाळा, जि सातारा.
3) पुणे टीम:- दि.25 जानेवारी २०२१ ठिकाण:- मु.पो.काळदरी ता.पुरंदर जि.पुणे
4)सांगली टीम : दि. 26 जानेवारी 2021 ठिकाण:शिगाव ,वाळवा
5)संभाजीनगर टीम : दि 26 जानेवारी 2021,ठिकाण :-तिरुमला कॉम्प्लेक्स ,देवळाई रोड संभाजीनगर
6)धाराशिव टीम : दि. 26 जानेवारी 2021 ठिकाण प्रतिष्ठाण भवन,राजे बाग छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव
7) महा मुंबई टीम : दि. 26 जानेवारी 2021 ठिकाण: केमिस्ट भवन ब्लड बँक,सानपाडा (पूर्व),सेक्टर 8 नवी मुंबई.
8) नागपूर टीम :- दि. 26 जानेवारी २०२१.
ठिकाण:- शिवाजी नगर मनपा उद्यान, नागपूर.
9) लातूर टीम : दि.26 जानेवारी नेटिझन्स एकेडमी, लातूर .
10) धुळे टीम : दि.26 जानेवारी,सुशीलनगर धुळे
11) बेळगांव टीम : दि.26 जानेवारी ठिकाण- महर्षी वाल्मिकी भवन.साखरवाडी, निपाणी.
12) ठाणे टीम : दि. 28 जानेवारी 2021 रोजी, ठिकाण – रायते गाव, कल्याण.