खामगांव : भारतीय बौध्द महासभा शहर शाखा खामगांव यांचे वतीने दि.१ जानेवारी २०२१ रोजी भिमा कोरेगांव शौर्य दिन सोहळा भव्य स्वरुपामध्ये संपन्न झाला. सर्वप्रथम व्दिप प्रज्वलन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना,हार अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. समता सैनिक दलाच्या वतीने विजय स्तंभाच्या प्रतिकृतीस मानवंदना देण्यात आली (गॉड ऑफ ऑनर) समता सैनिक दलाचे संचलन मेजर जनरल के.एम. हेलोडे साहेब यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
यावेळेस समता सैनिक दलाचे कॅप्टन रामकृष्ण सावंग व ज्योतीराम सरदार (मेजर) यांचे वतीने समता सैनिक दलाचे निरीक्षण करण्यात आले. यानंतर सेवानिवृत्त माजी सैनिकाचा स्वपत्नीक गौरव सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी रक्तदान गिनी शिबीर राबविण्यात आले. त्या शिबीरात सहभाग घेवून रक्तदान दात्याचा मानसन्मान करण्यात आला. तसेच समता सैनिक दलामध्ये सहभाग घेणायांचा सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा शहर अध्यक्ष मा. दादारावजी हेलोडे हे होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थीती म्हणून शरद वसतकार, के के. शेगोकार, के.एम. हेलोडे, विजय वानखडे (नगरसेवक), संघपाल जाधव, बी.के. हिवराळे साहेब, सुरेश गव्हांदे, मिलींद वानखडे, रामदास गवई,अनिल वानखडे,अनिताताई डोंगरे, सुमनबाई थाटे, विशाखाताई सावंग, गिताताई नरवाडे, आरतीताई गवई, कमलबाई हिवराळे, पदमाताई तायडे, शेषराव तायडे, पुंडलीकराव तायडे, जनार्दन वाकोडे, सिताराम तिडके, शिवदास तायडे, विक्रमजी नितनवरे, दगडूभाऊ सरदार,जे.के. रणित, गजानन जाधव, जी.यु. गवई सर, गुणवंत वाकोडे, वासुदेव खंडेराव, शानिए नितीन बांगर, सतीश वानखडे, सचिन कवठेकर, महेंद्र सावंग, हर्षवर्धन खंडारे, संदिप वानखडे, विष्णु गवई, अतुल इंगळे, हर्ष वाघ, आकाश जावळे, विजय कांबळे, अनिरुध्द सावदेकर, प्रणव तायडे, अजय गवई, प्रसनजित गव्हांदे, ज्योतीताई गवई, सुनिल सरदार, करुणाताई गवई, दादाराव मोरे तसेच समता क्रिडा मंडळाचे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला खामगाव शहरातील सर्व क्रिडा मंडळाच्या वतीने कार्यक्रमास सहभाग घेतलाव कार्यक्रमास सहकार्य केले. तसेच समता सैनिक दलास मा. राजूभाऊ वानखडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. के.के. शेगोकार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अथक परीश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी झाला.