शेगाव : येथील रेणुका नगर परिसरात राहणाऱ्या 17 वर्षीय युवकाने साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नगर रेणुका नगर भागात राहणारा सिद्धेश्वर प्रकाश चितळे वय १७ या युवकाने आपल्या राहत्या घरातिला लाकडाला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग क्रमांक 40 नुसार अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गेल्या महिन्याभरात खामगाव व शेगाव तालुक्यात युवकांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक वाढलेले असून या मागे नेमके कुठले कारणे आहेत ह्याची घरच्यानी जाणुन घेतले पाहिजे.