आता बुलडाणेकरांच्या सेवेत हापुस आंबा..
रत्नागिरीच्या हापुस अंब्याची चव चाखता येईल..
बुलडाणा : कोरोनाच्या संकट काळातही बुलढाणा शहरातील नागरिकांना हापुस अंब्याची चव चाखता यावी या मुख्य उद्देशाने बुलढाणा अर्बन संस्थेच्या वतीने ३ हजार पेटया हापुस आंबा बुलढाणा येथे आनण्यात आल्या आहे. कोविड-१९ चे सर्व नियमाचे पालन करून नाम मात्र शुल्कात हापुस आंबा उपलब्ध करुण देण्यात आला आहे. आज बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे चीफ मैनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झवर यांच्या हस्ते हापुस आंबा स्टॉल चे उद्घाटन करण्यात आले. बुलढाणा शहरातील बुलढाणा प्राइड बिल्डिंग मद्धे हाउस अंब्याचा स्टॉल लावण्यात आला असून कोकणातील रत्नागिरी येथून हा हापुस आंबा आणल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच तब्बल १६ वर्षापासून दरवर्षी हापुस आंबा संस्थेच्या वतीने बुलढाणा येथे आणल्या जातो. यावर्षी हापुस आंबा थेट नागरिकांच्या घरी पोहोचविण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली असल्याने कोरोनाचा संसर्ग थांबविन्यात मदत होणार आहे. रोख रक्कम न देता ऑनलाइन पेमेंट करण्याची सोय सुद्धा करण्यात आली आहे. या कोरोनाच्या संकट काळात सुद्धा हापुस आंबयाची चव नागरिकांना चाखता येणार असल्याने नागरिकांमद्धे आनंदाचे वातावरण पसरले आहे.