खामगांव तालुक्यामधील पोलिस पाटलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन…
खामगांव : राज्यातील पोलिस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक १५ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर महारष्ट्र राज्य पोलिस पाटील असोसिएशन संघटनेचा महामोर्चा चाचा नेहरु बाल उद्यान शुक्रवारी तलाव येथून निघणार आहे .राज्याचे अध्यक्ष महादेव नगोरगोजे पाटील राज्य कार्यकारी अध्यक्ष राहुल उके पाटील कार्याध्यक्ष रुपेश सावरकर विदर्भ अध्यक्ष नंदू दादा हिवसे राज्य समन्वयक कारभारी निघोटे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पाटील तथा संपूर्ण राज्यातील जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्त्वात हा महामोर्चा निघणार आहे.राज्यातील पोलिस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या बाबत वारंवार शासनाला निवेदन सादर केलेले आहेत तसेच मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री , गृहमंत्री,महसूल मंत्री यांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत परंतु शासनाने या गावपातळीवरील अत्यंत महत्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष केले आहे त्याकरिता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ डिसेंबर ला या महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.यामधे पोलिस पाटील यांना दरमहा २५ हजार मानधन देण्यात यावे ,महाराष्ट्र राज्य पोलिस अधिनियम १९६७ दुरुस्ती, पोलिस पाटील सेवाशर्ती १९६८ कायद्याची काटेकोर अंमलबजावणी ,थकीत प्रवास भत्ता ,नूतनीकरण बंद वयोमर्यादा ६५ पर्यंत करणे ,वर्षाला दोन उपविभागीय कार्यशाळा व प्रशिक्षण ,कर्तव्यावर मृत्युमुखी पडलेल्या पोलिस पाटील यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर त्वरीत पदावर घेण्यात यावे रिक्त जागा तत्काळ भरण्यात याव्या प्रत्येक जिल्ह्यात पोलिस पाटील भवन इत्यादी मागण्या करिता हा महामोर्चा काढण्यात येणार आहे .तरी खामगाव उपविभागातील पोलिस पाटील यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खामगाव तालुका अध्यक्ष महादेव अवचार पाटील जिल्हा संघटक किशोर अंभोरे पाटील जिल्हा सचिव राजाभाऊ लोखंडकार प्रसिद्धी प्रमुख संतोष मोरे तालुका कार्याध्यक्ष विनोद चव्हाण सुरेश भिसे भगवान नेमाने मधुकर ढोले पाटील कंकाळे पाटील गणेश टिकार पाटील सौ रूपालीताई वानखडे यांनी केले आहे.