खामगाव:बाल वयातच बालकांवर सु स संस्कार झाले तर ते देशप्रेम आध्यात्म व खेळाकडे वळतील व भविष्यात चांगले नागरिक बनतील. यासाठी वेगवेगळ्या संघटना, संस्था, मंडळे यांचे तर्फे शिबिराचे आयोजन करण्यात येते. तसाच एक प्रयोग माटरंगाव येथील श्री गुरुदेव सेवा मंडळा च्या वतीने आचार्य श्री वेरुळकर गुरुजी यांचे प्रेरणेने कोरोना चा २ वर्षाचा कालावधी वगळता मागील १२ वर्षापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्वांगीण बाल सुसंस्कार शिवीराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरात आतापर्यंत एकूण १५०० बालकांवर आध्यात्मिक, शारीरिक, व बौद्धिक आदींचे धडे गिरवले गेले आहे.
त्यामुळे आज अनेक विद्यार्थी आज आध्यात्मा कडे वळले आहे. आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ झाली आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळ माटरगाव च्या वतीने या वर्षी दिनांक ३ में ते १३ मे या कालावधीत १३ वे निवासी सर्वांगीण बाल सु संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या मध्ये माटरंगाव, मडारखेड, जलम्ब, पिंप्री देशमुख, पिंप्री, भेंडवल, मॅचिंदरखेड, खेर्डा, माक्ता कोक्ता , पहुरजिरा, जळगाव जामोद, खामगाव, लांजुड, या सह जिल्ह्यातील विविध गावातील, वय वर्ष १२ ते १६ वयोगटातील एकूण १२५ मुलांनी सहभाग घेतला. हे शिबीर माटरंगाव येथील रामलिंग संस्थान येथे घेण्यात आले होते. या शिबिरात वेरुळकर गुरुजी मनीष देशमुख – यांनी बौद्धिक, ईश्वर पांडव यांनी लाठी काठी, श्याम वडतकर यांनी -संगीत, राम देशमुख यांनी योग आसन, रजत गुरुजी यांनी -लेजिम, महेंद्र निवाने यांनी -वाद्य मल्लखांब संजय मुरे यांनी – हरीपाठ चालीतील पावल्या तसेच उद्धव नेरकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीतेतील गोवनश सुधार या विषयावर मार्गदर्शन केले.समारोपीय कार्यक्रमाला मंजित शीख,अनिल गवई, जिल्हा परिषद सदस्या देवचे,सुरेश वनारे,अरविंद शिंगाडे यांच्या सह परिसरातील १००० च्या वर नागरिक उपस्थित होते.
शिबिरात उपस्थित राहून माझी पूर्ण दिनचर्या मध्ये पूर्ण बदल झाला अगोदर उशिरा उठणे, मोबाईल पाहणे आदी मध्ये वेळ जायचा परंतु आता ग्रामगीता वाचन, संगीत, योग आसन, व्यायाम आई वडिलांना कामात सहयोग करतो. शिबिरातील वातावरण अत्यंत खेळीमेळीचे व अनुशासित होते. निश्चितच 10 दिवसा पेक्षा जास्त दिवसाचे व प्रत्येक गावात शिवीर आयोजन व्हावे.पार्थ उद्धव नेरकर, जलंब
प्रत्येक पालकाला वाटते आपले पाल्यावर सुसंस्कार व्हावे, परंतु कोरोना मध्ये अभ्यासा व्यतिरिक्त अवांतर गुणांचा विकास पूर्णपणे थांबला होता. त्यासाठी अशी शिबिरे सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य करीत आहे. श्रीकृष्ण तांदुलकार,खेर्डा