खामगांव : शिवसैनिकांचे आराध्य दैवत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक महावीर भवन येथे भव्य रक्तदान शिबीराचे युवासेना परिवारा तर्फे आयोजित करण्यात आले होते. दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली बाळासाहेबांची जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात शिवसैनिकांकडून विविध कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये रक्तदान शिबिरे आणि इतर सार्वजनिक उपक्रमांचा प्रामुख्याने समावेश असतो. जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ़ी मधे ७१ बॅग रक्त उपलब्ध आहे. याच अनुशंगाने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्त साधून खामगांव मधील महावीर भवन येथे युवासेने तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात एकूण ४० जणांनी रक्तदान केले आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खामगांव युवासेना शहर प्रमुख राहुल कळमकार होते तर कार्यक्रमामधे प्रमुख उपस्थिती मधे युवासेना जिल्हा प्रमुख श्री ऋषीकेश जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, सुरेश वावगे, ऍड बाबू भट्टड हे होते. निलेश देवताळू, कामगार सेनेचे विनोद हिरळकर, श्रीराम खेलदार, बंडू बोदडे, विजू बोर्डे, धिरज कंठाळे, शिवा निंदाने, प्रितेश टाले, चेतन गायकवाड, युसूफ शेख, सुनील नवले, आनंद चिंडाले, बहादूर वाघे, भूषण राजपूत, नागोराव लांडे, आकाश सपकाळ, राजू कोथळकर, लकी पुरोहित, हर्षल पाटील, दिनेश आखरे, मंगेश देवीकर, आकाश दांडगे, रोहित भारसकाळे, उल्हास धात्रक, संतोष सावंग, विजेश पूरवार, अमोल निमकर्डे,उमेश धारपावर, कृष्णा धारपावर यांनी रक्तदान केले. यावेळी मोठ्या संख्येने युवासेने चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
