विजय बोराडे यांना मिळाली सर्वाधिक मते..
खामगांव : येथील हिंदुस्तान लिवर कामगार संघटनेची निवडणुक शांततेत पार पडली. दर ३ वर्षाने ही निवडणूक होत असते. यामधे एकूण ५६२ कामगारांनी आपले मतदान केले होते. त्यामध्ये ४८ उमेदवार निवडणुकीत उभे होते, त्यापैकी ११ निवडून आले आहेत.
झालेल्या या निवडणुकीमध्ये विजय बोराडे यांना सर्वाधिक २९८ मते मिळाली, तर, माणिक पाटील यांना २८३ मते मिळाली आहेत. विजय इंगळे २७८, गोपाल पारखे २२४, महेश परदेसी २२२, योगेश चव्हाण २०२, सुनील इंगोले २०२, अभय घाटोळ २००, लक्ष्मण हरमकार १८१, विलास भोसले १७५, सत्यप्रकाश दुबे १७५ यांना या प्रकारे मत मिळाली आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये कामगारांना येणाऱ्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी कामगार संघटना सदैव त्यांच्या पाठीशी राहील व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल असे निवडून आलेल्या उमेदवारांनी सांगितले.
सदर निवडणूक अत्यंत साध्या पद्धतीने व कोविड मध्ये शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून घेण्यात आली असे सुद्धा कामगार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे कामगारांतर्फे अभिनंदन सुद्धा करण्यात आले.