संग्रामपूर प्रतिनिधी :- मध्यप्रदेशात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अकोला, अमरावती व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हनुमान सागर प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्याने या प्रकल्पात 63 % पाणीसाठा जमा झाल्यामुळे आज दि. 18 जुलै रोजी सायंकाळी 5.45 वाजता या प्रकल्पातून वाण नदीत 4 वक्रद्वारे 50 से. मी. ने उघडून 64. 85 घ. मी./ से विसर्ग सोडण्यात आला. आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वाण आणि पूर्णा नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर यांनी दिला आहे. या गावात तहसीलदार वरगावकर यांनीं भेट देऊन दिला सतर्कतेचा इशारा खालील गावात भेट देऊन पोलीस पाटील, सरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी घेऊन गावात मुनादी देऊन नागरिकांनी नदीकाठी व नदी ओलांडून जाऊ नये असे सांगितले. सतर्कतेचा इशारा देण्यात आलेल्या गावामध्ये सगोडा, बल्लाडी, काटेल, काकनवाडा बु, रिंगणवाडी, दुर्गादैत्य, नेकणामपूर, पातूर्डा बु., वडगाव वाण, कोलद, काकनवाडा खु., मोमीनाबाद, वानखेड, पातूर्डा खु., या 14 गावांचा समावेश असून या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.