श्रद्धा की अंधश्रद्धा….?
खामगाव : येथील सराफा भागातील शिवमंदिर व हनुमान मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचा प्रकार आज खामगांव शहरातील अनेकांनी अनुभवला आहे. सराफा भागातील हे मंदिर पुरातन असून या ठिकाणी मंदिराच्या छतावरून बर्फाचे थेंब पडण्याचा इतिहास आहे. परिसरातील नागरिकांनी आज हे प्रत्यक्ष अनुभवले आहे. आज तर या मंदिरातील हनुमान जी च्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी वाहत असल्याचे अनेकांनी पाहिले. शहरात या गोष्टीची वार्ता कळताच अनेक हनुमान भक्तांनी मंदिरात गर्दी केली होती. तर हा चमत्कार म्हणावा की शास्त्र अशा प्रकारच्या प्रतिक्रिया घटनास्थळी उमटत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.