खामगाव : लक्ष्मीनारायण ग्रुप द्वारा संचालित स्व.सौ. मीनाताई जाधव आयटीआय मध्ये शिकविण्यात येणारे फिटर, ईलेक्ट्रिशियन व सर्व्हेयर या अभ्यासक्रमांचा निकाल एनसीव्हीटी, नवी दिल्ली तर्फे जाहीर झाला असून यामध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन व सर्व्हेयर ट्रेडचा निकाल 100% लागला आहे. जिल्ह्यामध्ये दर्जेदार कौशल्य शिक्षण देण्याकरिता लक्ष्मीनारायण ग्रुप, खामगाव द्वारा संचालित स्व.सौ. मीनाताई जाधव आयटीआय चे अग्रक्रमाने नाव घेतले जाते. कोरोना काळामध्ये सुद्धा शासकीय निर्देशाप्रमाणे ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे सुरू होते. त्याचेच फळ म्हणून स्व.सौ. मीनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जास्तीत जास्त विद्यार्थी 80% पेक्षा जास्त गुण घेऊन श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. स्व.सौ. मीनाताई जाधव आयटीआय इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये उज्ज्वल निकम प्रथम, आदित्य खाडे द्वितीय क्रमांक तर रामप्रसाद धांडे हा तृतीय आला आहे. फिटर ट्रेड मध्ये विपुल गव्हाळ प्रथम, मंगेश खानीवाले द्वितीय तर वैभव चंदनशिव हा तृतीय आला तसेच सर्व्हेयर ट्रेड मध्ये अजिंक्य देशमुख प्रथम, साहिल चव्हाण द्वितीय तर कु. साक्षी देशमुख तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, संचालिका सौ. राजकुमारी चौहान व प्राचार्य राहुल अग्रवाल यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत निदेशक अजय घाटे, आकाश खंडेराव, नरेंद्र मारवाडी, पुष्कर फुलभाटी, अमर वाघमारे, वंदना जाधव, सुलोचना गणोरकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कौतुक केले.
