April 11, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

स्व. सुभाषराव देशपांडे यांचे प्रेरणेतून शहराचा विकास सुरूच ठेवणार:आ.अँड.आकाश फुंडकर

खामगाव: कुशल संघटक , प्रेरणादायी व्यतिमत्व स्व. सुभाषराव देशपांडे यांचे खामगाव शहरासाठी मोठे योगदान आहे, त्यांच्या प्रेरणेतून खामगाव शहराचा विकास मोठ्या प्रमाणात सुरूच ठेवू असे वक्तव्य भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकश फुंडकर यांनी केले.आज 26 जानेवारी रोजी भाजप कार्यालयात शहराचे माजी नगराध्यक्ष स्व.सुभाषराव देशपांडे यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम आमदार अँड आकाश फुंडकर यांनी भारत माता व सुभाषराव देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन केले. यावेळी भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, डॉ एकनाथ पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, न प आरोग्य सभापती ओम शर्मा, नगरसेवक गणेश सोनोने, जितेंद्र पुरोहित, शेखर कुलकर्णी, वैभव डवरे, गुलजम्मा शहा, नागेंद्र रोहनकार, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, समाधान मुंढे, गजेंद्र मुळीक, योगेश आळशी, प्रसाद एदलाबादकर , रोशन गायकवाड, प्रतीक मुंढे, निखिल सेवक, आशिष सुरेखा, विक्की सारवाण, राहुल जाधव, निरजबाबा निंदाने, आकाश बडासे, हृषीकेश तंबोले, अविनाश सुसगोहर, भावेश दुबे, निकुंज मंदानी, गौरव माने, विक्की रेठेकर, अजय भातुरकर, विक्की हत्तेल, पवन डिक्कर, राहुल चुनेकर, श्रीकांत जोशी, आदित्य अहिर, किरण दांडगे, श्रीमंत पाचपोर, आदी भाजप, भाजयुमो, विद्यार्थी आघाडी पदाधिकारी व सदस्यांनी भारत माता तसेच स्व.सुभाषराव देशपांडे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून नमन व अभिवादन केले.

Related posts

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळाला उच्च न्यायालयाचे संरक्षण

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 399 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 42 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

ऑपरेशन मुस्कान दरम्यान शहर पोलीसांनी हरविलेल्या बालकास दिले ताब्यात

nirbhid swarajya
error: Content is protected !!