November 20, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ विविध लेख सामाजिक

स्व.संजयभाऊ ठाकरे पाटील यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..

स्व. संजयभाऊ ठाकरे पाटील यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

खामगाव : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य, सकल मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय संजयभाऊ ठाकरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ६ मार्च २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वर्गीय संजयभाऊ ठाकरे पाटील यांची जयंती दरवर्षी विविध कार्यक्रमांनी साजरी केल्या जात असते.यावर्षी असेच विधायक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये 6 मार्च रोजी ९.३० वाजता रुग्णांना फळ वाटप, १० वाजता रेल्वे स्टेशन परिसरात अनाथ व अनवाणी व्यक्तींना स्लीपर चप्पलचे वाटप, त्यानंतर अकरा वाजता जलंब नाक्यावरील सकल मराठा सेवा संघटनेच्या कार्यालयासमोर पानपोईचे उद्घाटन तसेच स्वर्गीय संजयभाऊ ठाकरे पाटील बळीराजा आत्मसन्मान योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सकल मराठा सेवा संघ, श्री छत्रपती प्रतिष्ठान, स्वर्गीय संजय ठाकरे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट खामगाव यांच्या वतीने स्वप्निल संजय ठाकरे पाटील तसेच पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Related posts

अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध योग्य ती कायदेशिर कार्यवाही करावी- राष्ट्रवादीची मागणी

nirbhid swarajya

शिक्षण विभागाला रिक्त पदांचे लागले ग्रहण गटशिक्षणाधिकारी सह शिक्षकांची 93 पदे रिक्त

nirbhid swarajya

अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. शिंगणेंच्या होमटाऊन मध्ये रुग्णांचे नातेवाईक त्रस्त

nirbhid swarajya
error: Content is protected !!