खामगाव : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ चांदूर बिस्वा शाखा यांचेकडून या वर्षी पासून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रस्ताव सादर केले होते, त्यामध्ये काही प्रस्तावावर विचार करून अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये “स्व.भाऊसाहेब फुंडकर स्मृती कृषी सेवा कार्य गौरव पुरस्कारा” साठी जलंब ता. शेगाव येथील सुरभी सेवा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव उद्धव नेरकर याना जाहीर करण्यात आला आहे. नेरकर यांनी ५ वर्ष “भारतरत्न नानाजी देशमुख” यांच्यासोबत चित्रकूट मध्य प्रदेश येथील “युगानुकूल ग्रामीण पुनर्रचनेच्या ५० किलोमीटर परिधी तील ५०० गावांमध्ये प्रत्यक्ष कार्य करून व त्यांच्याच कार्याची प्रेरणा घेऊन जलंब येथे ‘शिक्षा, स्वास्थ, सदाचार व स्वावलंबन ला केंद्रस्थानी मानून संस्थेच्या माध्यमातुन मागील ७ वर्षा पासून ‘गौ आधारित ग्रामोद्योग, सेंद्रिय शेती, जलसंवर्धन, स्वच्छता, योग् व प्राकृतिक चिकित्सा, गोवंश रक्षण व संवर्धन,आदी विषयामध्ये वेगवेगळ्या शिबिराचे आयोजन करून प्रचार व प्रसार केला आहे. महाराष्ट्र राज्यात पालघर पासून ते गडचिरोली, मेळघाट सारख्या आदिवासी भागात सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत “ग्रामगीतेतील” गोवंश सुधार या अध्यायातील देशी गोवंशाचे महत्व, त्यापासून तैयार होणारे उत्पाद, शेण गौमुत्रा चे मूल्यवर्धन, पंचगव्याचे धार्मिक, आर्थिक, सामाजिक तसेच वैज्ञानिक महत्व जनतेपर्यंत पोहचविण्यांत त्याचे महत्वाचे योगदान आहे. स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा अभ्यास अतिशय दांडगा होता. ग्रामीण स्तरातील शेतकऱ्यांच्या व्यथांची त्यांनी जाणीव होती म्हणून कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांचा उपयोगी अनेक योजना अमलात आणल्या. त्यांच्याच कार्याला अभिप्रेत कार्य वेगवेगळ्या विषयाला धरून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, गुजरात राज्यातील शेतकऱ्यांसाठी जलंब येथील उद्धव नेरकर करीत आहेत म्हणून त्यांची निवड सदर पुरस्कारासाठी करण्यात आली अशी माहिती तालुका सेवाधिकारी तथा समिती प्रमुख प्रा. किशोर अशोकराव जाधव ,तालुका प्रचारक प्रदिप महादेव तांदूळकर, तालुका सचिव निवृत्ती तायडे, तालुका संघटक समाधान वावगे ,तालुका युवक प्रमुख सुयोग माहुलकर ,तालुका सदस्य सुभाष साबे ,अशोक मापारी, दत्तराज गुजर, गजानन बिचारे ,माणीक पवार, गजानन सातव , यांनी दिली असे प्रसिद्धी प्रमुख रविंद्र पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.