विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी आक्रमक…
अकलूज: ग्रामीण भागातील वरदायणी असलेली राज्य परिवहन महामंडळ बस सेवा मानली जाते सध्या अकलूज या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी सायंकाळी शैक्षणिक वेळ संपल्यानंतर ५:०० ते ५:३० वाजन्याच्या सुमारास घरी लवकर जाणेसाठी,अकलूज ते दसुर आणि अकलूज ते सांगोला या प्रवास मार्गातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी एस. टी.बसची अतिरिक्त फेरी वाढवावी,शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज समोर बस थांबा चा फलक लावून विद्यार्थ्यांची थांबण्याची त्याठिकाणी सोय व्हावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका यांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन अकलूज आगार प्रमुख यांचेवतीने श्री.दळवी साहेबांनी निवेदन स्वीकारले
निवेदनात असे म्हटले आहे की सध्या शंकरराव मोहिते महाविद्यालय माळेवाडी अकलूज,सदाशिवराव माने महाविद्यालय अकलूज तसेच अभ्यासक्रम निगडित व संगणकीय प्रशिक्षण तासिका यांचा ठीक ५:०० वाजनेच्या सुमारास शैक्षणिक वेळ संपन्याचा कालावधी आहे.या काळात माळशिरस तालुक्यातील अकलूज ते सांगोला या भागातील खंडाळी,वेळापूर,साळमुख,मलोल फळवणी,कोळेगाव आणि अकलूज ते दसुर या प्रवास मार्गातील खंडाळी, वेळापूर, उघडेवाडी, तोंडले, बोंडले, दसुर या गावातील वयोवृध्द,तरुण,विद्यार्थी,शेतकरी,कामगार यांची बस वेळेअभावी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सध्या अकलूज हुन सांगोलाकडे जाणारी बस आहे त्या एस. टी. बसेसचा वेळ ४:१५ ते ४:३० दरम्यान प्रवास वेळ असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घरी जाणेसाठी सायंकाळच्या ८:०० वाजेपर्यंत माळेवाडी कॉलेजजवळ व अकलूज नवीन एस्टी स्टँड वर तासनतास थांबावे लागत आहे.तसेच शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज माळेवाडी कॉलेजसमोर विद्यार्थ्यांच्या हितासाठी बस थांबा चा फलक लावून तिथे थांबण्याची सोय करावी जेणेकरून विद्यार्थी तेथेच थांबतील लगेच त्यांना आपल्या गावी जाता येईल.रस्त्याच्या बाजूला उभे राहून एखाद्या अपंग व्यक्तीने हात केला तर त्यांना ड्राइव्हर कडून नेले जात नाही.शेतकरी,कामगार,शेतमजुर,अपंग,विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्या ये-जा प्रवासाच्या बाबतीत येणाऱ्या काळात कोणत्याही प्रकारच्या त्रास होणार आपल्या प्रशासन यंत्रनेकडून होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा अनोखे आंदोलन करून आपल्या प्रशासनाला जागं करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड यांनी निवेदनात दिला आहे.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर,राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे सागर दुपडे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रमुख अजित कोडग,विद्यार्थी आघाडी तालुकाप्रमुख शिवराम गायकवाड,माळशिरस विधानसभा प्रमुख साहिल आतार,समाधान काळे,तेजस भाकरे,आहील पठाण,सचिन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केलेल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठीच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा भविष्यात आंदोलन करण्यात येईल.असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.
अजित बोरकर.
तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, माळशिरस