मलकापुर : स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यानी आज मलकापुर रेल्वे स्टेशन वर रोखली. नवजीवन एक्स्प्रेस रोखल्याने मलकापूर रेल्वे स्थानकावर कार्यकर्ते आणी पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. शेतकऱ्यांच्या भारत बंदला जोरदार सुरुवात झाली आहे.’स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आज सकाळ पासून रस्त्यावर उतरली आहे.
https://www.facebook.com/111747353687089/posts/242068450654978/
सकाळी 6.40 वा. चेन्नई – अहमदाबाद एक्सप्रेस रोखून रविकांत तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी रविकांत तुपकर सह कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली त्यामुळे ‘स्वाभिमानी’ आणि पोलिसांमध्ये चांगलाच संघर्ष निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे..तर पोलिसानी 20 ते 30 कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतलं असून येत्या 3 दिवसांत कायदा रद्द न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.