खामगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या घाटाखालील जिल्हाध्यक्षपदी शाम अवथळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवार दि.८ फेब्रुवारी रोजी स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलडाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक पार पडली. दरम्यान राजू शेट्टी यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. यामध्ये घाटाखालील जिल्हाध्यक्षपदी स्वाभिमानीचे आक्रमक नेते म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या शाम अवथळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांच्या हस्ते शाम अवथळे यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न शासनदरबारी मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासोबतच पक्षवाढीसाठी कार्य करावे व दिलेली जबाबदारी समर्थपने सांभाळावी असे यावेळी शेट्टी यांनी अवथळे यांना सांगून शुभेच्छा दिल्या.